maharashtra

२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime against one for causing loss of Rs. 2 lakh 25 thousand
२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : २ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ मार्च रोजी ११ वाजण्याच्या सुमारास नेले, ता. सातारा येथे तेथीलच चंद्रकांत सदाशिव धोत्रे यांनी गट क्रमांक ६११ व ६१२ येथे तीस गुंठे क्षेत्रातील ऊसास त्यातील ठिबक सिंचन पाईप, आंब्याची झाडे, तसेच आनंदराव श्रीरंग जाधव यांच्या दीड एकर क्षेत्रातील ऊस आणि अक्षय संजय फडतरे यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यात शेजारी असलेल्या कडब्याच्या गंजीला आग लावून २ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार विजय गुलाब जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.