वाठार, ता. कराड येथे पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिली. गुरुवारी 20 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.
कराड : वाठार, ता. कराड येथे पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिली. गुरुवारी 20 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाठार गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर कराड-कोल्हापूर लेनवर साईड पट्टीलाा दुचाकी ( एम.एच. 50 ई. 3750) थांबली होती. या दुचाकीवर दोन जण बसले होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने ( एम.एच. 45 एक्स 2934) जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन जण जखमी झाले
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ अपघातस्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी जखमी दुचाकीस्वारांना रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली नव्हती.


