maharashtra

गोसाव्याचीवाडी येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन; चौघांवर गुन्हे दाखल


Organizing unlicensed dog races at Gosavachiwadi; Charges filed against four
गोसाव्याचीवाडी, ता. खटाव येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तेथीलच चौघांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : गोसाव्याचीवाडी, ता. खटाव येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तेथीलच चौघांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोसाव्याचीवाडी गावच्या हद्दीत कुमठे फाटा परिसरातील मोकळ्या तेथीलच रोहन विजय फडतरे, प्रमोद दिलीप फडतरे, हिम्मत जगन्नाथ पिसाळ,  हरी जगन्नाथ मिसाळ  यांनी विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस कर्मचारी पंकज भुजबळ यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिली.