maharashtra

सातारा शहरातील विकास कामांसाठी 10 कोटी 57 लाख रुपयांचा निधी पालकमंत्र्यांकडून मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती

सातारा शहरातील तब्बल 16 कामांसाठी वेगवेगळ्या योजनांमधून 10 कोटी 57 लाख 24 हजार 193 रुपये निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सातारा : सातारा शहरातील तब्बल 16 कामांसाठी वेगवेगळ्या योजनांमधून 10 कोटी 57 लाख 24 हजार 193 रुपये निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, सातारा शहरासाठी अमृत योजना, नगरोत्थान आयडीसीएमटी, यूआयडीएसएमटी, नगर विकास अंतर्गत येणाऱ्या यूडी -6, वैशिष्ट्यपूर्ण योजना जिल्हा नियोजन व खासदारांचा स्थानिक विधी अशा विविध माध्यमातून सातारकरांना सुविधा देण्यासाठी वारंवार विकास कामांचे प्रस्ताव दिले जात आहेत. सध्या उदयनराजे यांच्या माध्यमातून सोळा कामांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला होता.
यामध्ये लक्ष्मी टेकडी येथे घरकुल इमारत दुरुस्त करणे एक कोटी दोन लाख 87 हजार, लक्ष्मी टेकडी येथे अंतर्गत रस्ते व गटार करणे एक कोटी 22 लाख, 6 हजार 892, विलासपूर येथे शौचालय बांधणे 17 लाख 29 हजार, अजिंक्यतारा रोड हरिजन गिरीजन सोसायटी ते दलित वस्ती जोडणारा रस्ता व गटर करणे 53 लाख 32 हजार, सदर बाजार भिमाबाई हाऊसिंग सोसायटी येथे काँक्रीट रस्ता करणे 13 लाख 32 हजार, इंदिरानगर झोपडपट्टी अंतर्गत रस्ते करणे, 14 लाख 11 हजार विलासपूर इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात स्त्रियांसाठी शौचालय उभारणे 17 लाख 29 हजार, बालाजी अपार्टमेंट पिछाडीस दलित वस्ती येथे रस्ते करणे 29 लाख 28 हजार, डॉक्टर पोळ ते राधिका रोड ॲक्सिस बँक अखेर आरसीसी गटर करणे 46 लाख 33 हजार, अजंठा चौक झोपडपट्टी अंतर्गत रस्ते करणे सात लाख 24 हजार, लक्ष्मी टेकडी येथे स्त्रियांसाठी शौचालय बांधणे 16 लाख 7 हजार, केसरकर पेठ येथे कॅनॉल टाईप गटार करणे 19 लाख 96 हजार, सदर बाजार येथील उद्यानातील कंपाउंड वॉल करणे एक कोटी 85 लाख, करंजे येथील औद्योगिक वसाहती माजगावकर माळ ते महानुभाव मठ येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण एक कोटी 55 लाख, मंगळवार पेठ साई विहार आपार्टमेंट ते साईबाबा मंदिर एक कोटी एकोणपन्नास लाख 362 अशा एकूण 16 कामांना दहा कोटी 57 लाख 24 हजार 193 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या कामांसंदर्भात पुढाकार घेतल्याने नियोजन समितीने या कामांना निधी दिला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे.