maharashtra

गौरीशंकर च्या कला विद्यार्थ्यांचे साताऱ्यात कला प्रदर्शन

री कनेक्ट विथ आर्ट या संकल्पनेतून 21 व 22 ऑक्टोबर रोजी दीपलक्ष्मी सभागृहात रंगणार चित्रमेळा

गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या कला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या हॉलमध्ये री कनेक्ट विथ आर्ट या संकल्पनेतून दिनांक 21 व 22 ऑक्टोबर रोजी चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांनी दिली.

सातारा : गेल्या 27 वर्षापासून कला प्रांतांमध्ये सक्रिय असणाऱ्या गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या कला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या हॉलमध्ये री कनेक्ट विथ आर्ट या संकल्पनेतून दिनांक 21 व 22 ऑक्टोबर रोजी चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांनी दिली.
या कार्यशाळेत चित्रकार गीता मामनिया, मनीषा काळे, विवेक जाधव, महानंदा खांडेकर, रोहिणी यादव, मनीषा जाधव, सादिक शेख, निलाक्षी आवळे यांची चित्रे सादर केली जाणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य धुमाळ यांनी या संकल्पनेविषयी आणि चित्र प्रदर्शनाविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले, मुंबई येथील सुप्रसिद्ध चित्रकार गजानन कबाडे यांनी 21 व 22 मे रोजी बामणोली येथे आयोजित कार्यशाळेमध्ये चित्रकृती संदर्भात मार्गदर्शन केले होते. या कार्यशाळेत निसर्ग चित्र निसर्गातून रचना चित्र तसेच त्यातून कलाकृती निर्मिती यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. चित्रकारांनी त्याचा महाविद्यालय जीवनातील पूर्वानुभव व मार्गदर्शकाचे मार्गदर्शन यांचा समन्वय साधून चित्र निर्मिती केली. या चित्रनिर्मितीचा एक उत्स्फूर्त आविष्कार म्हणून 21 व 22 ऑक्टोबर रोजी दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या हॉलमध्ये या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. कार्यशाळेमध्ये सातारकरांना ही चित्रे पहावयास मिळणार आहेत. साधारण 25 चित्रे या उदाहरणांमध्ये सादर केली जातील, असे ते म्हणाले.
चित्र प्रदर्शनाचे आयोजन गौरीशंकर महाविद्यालयाच्या कला विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केले आहे. या कलाप्रदर्शनाचा लाभ सर्व सातारकरांनी घ्यावा तसेच साताऱ्यातील कलाकारांनी सातत्याने कलेच्या क्षेत्रात सक्रिय राहून आपले योगदान सादर करावे आणि सातत्याने कलेशी संदर्भित रहावे, याकरता या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले.