देगाव फाटा येथील एका अपार्टमेंट मध्ये चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : देगाव फाटा येथील एका अपार्टमेंट मध्ये चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते पावणेतीन च्या दरम्यान सपना बाळासाहेब पवार राहणार कल्पतरू अपार्टमेंट, सुमन नगरी, अमर लक्ष्मी स्टॉप, देगाव फाटा, सातारा यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून तेथीलच कोमल निलेश सपकाळ वय 28 हिने कपाटात ठेवलेले सोळाशे रुपये चोरी करून नेले आहेत. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक अवघडे करीत आहेत.


