संशयास्पद माल जवळ बाळगल्या प्रकरणी सदर बझार येथील एका भंगार व्यापार्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : संशयास्पद माल जवळ बाळगल्या प्रकरणी सदर बझार येथील एका भंगार व्यापार्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता कोयना सोसायटी सदर बाजार येथील हर्षल स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानाची तपासणी केली असता त्या दुकानामध्ये 3 हजार रुपये किमतीची एक खोललेली पाण्याची मोटर, 2 हजार रुपये किमतीचा तांब्याच्या तारेचा गठ्ठा, 5 हजार रुपये किमतीचा एक काळा व सिल्वर कलरचा कॅमेरा दुकानात आढळून आला. या मालाच्या मालकी हक्काबाबत दुकानाचे मालक चंद्रकांत दत्तात्रय भोसले वय 55 राहणार धनगरवाडी सातारा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच या मालाच्या मालकी हक्क बाबत त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत म्हणून त्यांच्यावर संतोष जयसिंग कचरे वय 30 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार टकले करीत आहेत.


