खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून खेड ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अठरा हजाराच्या आसपास असताना राजकिय दबावापोटी अवघे शंभर नागरिकांना घेऊन सभा पार पाडण्यात आली.
सातारा : खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून खेड ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अठरा हजाराच्या आसपास असताना राजकिय दबावापोटी अवघे शंभर नागरिकांना घेऊन सभा पार पाडण्यात आली. गांभीर्याची गोष्ट कोरम पूर्ण करण्यासाठी काही लोकांना बोलवून यासह काही लोकांकडे जाऊन सह्या घेणेचा पराक्रम प्रशासन व प्रतिनिधीनी केला आहे.
नगरपंचायती मध्ये वर्गीकरण हा गांभीर्याचा विषय असताना सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जेष्ठ नागरिकांना, नागरिकांना विचारात न घेता प्रशासक, ग्रामसेवक व काही राजकिय प्रतिनिधीनी मोगलाई, हुकूमशाही सारखे 'हम करे सो कायदा' प्रमाणे कामकाज सुरु केले आहे. सदर नगरपंचायत होण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे याचबरोबर असे महत्वाचे ठराव प्रशासक असताना घेऊन लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. तरी हे ठराव निवडणुकीनंतर लोकनियुक्त सदस्यांकडून होणे अभप्रित आहे, हे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. अशा वागणुकीस वेळेचं पायबंद घालणे आवश्यक असल्याचे समजून सातारा जिल्हाधिकारी, ग्रामविकास विभाग व मुख्यमंत्री कार्यालयाने सदरची दि. २४ नोव्हेंबर ची ग्रामसभा व यामध्ये घेतलेले सर्व ठराव रद्द करून सदर विषयावर पुनःश्च ग्रामसभा घेणेत यावी, अशी मागणी महारुद्र तिकुंडे (माहीती अधिकार) अध्यक्ष युवा राज्य फौडेशन यांनी सातारा जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
खेड ग्रामपंचायतीने नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव पूर्णपणे खेड ग्रामस्थांचा विस्वासघात करणारा आहे. या ठरावास मी समक्ष लेखी स्वरूपात विरोध दर्शिविला आहे. नागरपंचायतीमुळे सर्वसामान्य दीनदलित गरिबांवर वाढीव टॅक्स मुले अन्याय होणार आहे. सद्य लोकांना ग्रामपंचायतीचा टॅक्स भारणेसुद्धा शक्य होत नाही. सदर नगरपंचायत काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांच्या अट्टहासापायी बनविण्याचे षडयंत्र चालू आहे.
- उत्तमराव गायकवाड, माजी सदस्य, खेड ग्रामपंचायत, सातारा.


