maharashtra

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी 2022 पासून ते 13 डिसेंबर पर्यंत सातारा शहरात राहणाऱ्या एका युवतीच्या आई वडिलांच्या फोनवर फोन करून रितेश शामराव पाटील वय 26, रा. सलगरे, ता. मिरज, जि. सांगली याने बदनाम करण्याची धमकी देत तिच्याशी असभ्य भाषेत संभाषण केल्याप्रकरणी पाटील याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक भोसले करीत आहेत.