maharashtra

राहत्या घरातून युवती बेपत्ता


राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान पवाराची निगडी, ता. सातारा येथील एक युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद तिच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.