maharashtra

विहिरीवरील मोटारची चोरी


विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान भाऊ बाळासाहेब साहेबराव निंबाळकर यांच्या जमिनीमध्ये असलेली अशोक साहेबराव निंबाळकर वय 53 रा. शिंदे नगर, ता. फलटण यांची 7 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर कल्याण धाईंजे वय 19, मुन्ना मनेर वय 24, विनोद जाधव वय 18, सर्व रा. हनुमंतवाडी ता. फलटण यांनी चोरून नेली आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक फौजदार सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.