सातार्यात सत्संग सुरु असताना महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सर्व महिला बाहेरील जिल्ह्यातील असून पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
सातारा : सातार्यात सत्संग सुरु असताना महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सर्व महिला बाहेरील जिल्ह्यातील असून पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातार्यात सत्संग असल्याने जिल्हा परिषदेच्या मैदानावर गर्दी झाली होती. या गर्दीमध्येच चोरीच्या उद्देशाने काही माहिला आल्या होत्या. गळ्यातील सोन्याचे गंठण, सोन्याची चैन, मोबाईल, पर्समधील वस्तू चोरी होत असताना काही महिलांच्या निदर्शनास ही बाब आली. चोरी करणार्या एका महिलेला पकडल्यानंतर तात्काळ पोलिसांनीच संशयित महिलेला ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने इतर सहकारी महिलांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. काही महिला पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


