maharashtra

सातारा वनविभागाच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा वनविभागाने हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

सातारा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा वनविभागाने हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
आज दि. 8 मार्च रोजी सातारा वनविभाग सातारा यांच्या वतीने वनभवन सातारा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर स्थित कराड अतिरिक्त उपवनसंरक्षक सातारा उत्तम सावंत यांनी भुषविले.
कार्यक्रमाच्या व्याख्यानाचे पहिले पुष्प डॉ.जोशी यांनी गुंफुन महिला वनअधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या तक्रारीबाबत संवाद साधुन व्याख्यान दिले. तसेच अँडव्होकेट शहनाज शेख यांनी महिलांचे कायद्यामध्ये असणारे अधिकार सांगुन उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय भाषणावेळी उत्तम सावंत यांनी वनसंरक्षणामध्ये असणारा स्त्रियांचा वाटा याविषयी पौपीटी सादर करुन महिला दिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिले पाहिजे, असा मौलिक संदेश देऊन महिला दिनानिमित्त सर्व महिला वनकर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण सातारा वाघमोडे, तसेच सहाय्यक वनसंरक्षक महेश झाजुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती रेश्मा व्होरकाटे, कार्यालयीन महिला कर्मचारी श्रीमती चैताली बडेकर व वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा), सातारा  निवृती चव्हाण यांनी केले असुन या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती शितल फुंदे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) वडुज यांनी केले.
कार्यक्रमास सातारा वनविभाग सातारा प्रादेशिक व सातारा वनविभाग सातारा सामाजिक वनीकरण विभाग मधील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वनरक्षक राहुल निकम यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.