maharashtra

वाढे फाटा येथे जबरी चोरी; चौघांवर गुन्हा


वाढे फाटा येथे जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : वाढे फाटा येथे जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील वाढे फाटा ते पुणे जाणाऱ्या रोडवर असलेल्या सिद्धिविनायक पेढेवाले येथे सुरज विलास डांगे रा. साखरवाडी, ता. फलटण हा मोटरसायकल थांबवून थांबला असताना अनोळखी 20 ते 25 वयोगटातील चार जणांनी त्यांच्या मोटरसायकल वरून येऊन डांगे यांच्या हातावर, दंडावर आणि कमरेवर त्यांच्या हातातील सत्तुराने वार केले. त्याचबरोबर डांगे याचा मोबाईल आणि मागच्या खिशातील पाकिटात असलेले 6 हजार 100 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन व डांगे यांच्या मोटरसायकलचे नुकसान करून ते पळून गेले. याबाबतचा गुन्हा सातारा तालुका  पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मेणकर करीत आहेत.