maharashtra

विसावा नाका परिसरातुन युवती बेपत्ता


Missing girl from Visawa Naka area
येथील विसावा नाका परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील विसावा नाका परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैष्णवी किशोर घाटगे, वय १९, मूळ रा. बुध, ता. खटाव सध्या रा. विसावा नाका, सातारा, गजानन प्लाझा, बी विंग, फ्लॅट नंबर ४ ही युवती दि. २५ डिसेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार किशोर चंद्रकांत घाडगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.