maharashtra

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास करण जोशी तालुका कराड गावच्या हद्दीत असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ तेथीलच कृष्णत विष्णु पन्हाळकर वय 45 याने दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी त्याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.