एकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जकातवाडी, ता. सातारा येथील चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : एकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जकातवाडी, ता. सातारा येथील चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर बाबा भोसले, वय ३५, रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे याने जकातवाडी, ता. सातारा येथील बेबी सागर भोसले, मेनका शैलेश भोसले, रोहित शैलेश भोसले, शैलेश विश्वनाथ भोसले या चौघांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.२ ऑगस्ट रोजी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार क्रांती बाबा भोसले, रा. पाडेगाव, ता. फलटण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


