maharashtra

शिक्षण विभागातील दोषींवर कारवाई करून न्याय देऊ !

उपोषणकर्ते सुनील कदम यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचे आश्वासन

शिष्यवृत्तीबाबत दोषींवर कारवाई करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिले.

सातारा : शिष्यवृत्तीबाबत दोषींवर कारवाई करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिले.
येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या कार्यालयात उपोषणकर्ते सुनील कदम यांच्याबरोबर शिष्टमंडळाने सविस्तरपणे चर्चा केली. तेव्हा संबंधितावर कारवाई करून न्याय देण्याचे स्पष्ट आश्वासनासह लेखी पत्रही देण्यात आले. तेव्हा त्या बोलत होत्या. यावेळी कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सदरच्या शिष्टमंडळात चंद्रकांत खंडाईत, वसंत लोहार (पाटण), मधुकर काळे, गणेश कारंडे, बाळासाहेब सावंत व अनिल वीर यांचा समावेश होता.
शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (जिल्हा परिषद, सातारा) यांना सुनिल वामन कदम (जिल्हाध्यक्ष, युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्य) यांनी सादर करून सविस्तर चर्चा केली होती. मात्र, योग्य ती कारवाई सुरू न केल्याने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. तीन दिवसानंतर त्याची दखल घेतली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने आर्थिक दुर्बल, वंचित तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्याना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात. त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे. यासाठी अनेक शिष्यवृत्ती परिक्षा घेतल्या जातात. अशा शिष्यवृत्ती परिक्षा अनेक गरजु व होतकरू विद्यार्थी दिवस-रात्र एक करून मेहनत घेत असतात. आपल्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक तजवीज व्हावी, यासाठी पुर्ण क्षमतेने उत्तीर्ण होऊन अशा शिष्यवृत्ती मिळवतात. परंतु आपल्या विभागाकडून माहीती घेतली असता अनेक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे आढळून येत आहे. एवढेच काय आपल्या शिक्षण विभागातील काही आधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती पात्र काही विद्यार्थी गेल्या पाच वर्षापासुन या शिष्यवृत्ती पासुन वंचित असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा वरिष्ठांनी स्वतः लक्ष घालुन शिष्यवृत्ती पात्र वंचित विद्यार्थ्याना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळावी, म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली होती.
सदरची शिष्यवृत्ती डीबीटीद्वारे जमा होते. केंद्र शासनाकडून डायरेक्ट विद्यार्थ्याच्या अकांउटवर जमा होते. त्यामुळे शिक्षणाधिकार्‍याला कोणाला मिळाली किंवा नाही ? हे पाहण्यास लाॅगीन नाही. तेव्हा असे विद्यार्थी असतील तर त्याचे नाव व वर्ष असे कळवावे. म्हणजे केद्रशासनास पाठवता येईल. असा खुलासा कोळेकर यांनी केला होता. दोषींवर कठोर कारवाई करून न्याय देण्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, १० दिवस उलटून गेले तरी कदम यांना न्याय मिळाला नव्हता. म्हणूनच आंदोलन सुरू केले होते. तीन दिवसात विविध संघटनांनी भेटी देऊन पाठींबा जाहीर केला होता.
त्यामध्ये बाळकृष्ण देसाई, मिलिंद कांबळे, कृष्णत तरडे, सुभाष गायकवाड, सुधाकर काकडे, रमेश गायकवाड, गोरख वाघ, राजेंद्र सकटे, सतीश गायकवाड, श्रीरंग वाघमारे, विवेक चव्हाण, ऍड.वनिता भोसले, ऍड. विलास वहागावकर, ऍड. कांचन खरात, अमोल गंगावणे, जी. महेश, रफिक शेख, शशिकांत मोहिते, हिम्मतराव खरात, सुनील निकाळजे आदी विविध पक्षातील पदाधिकारी, ढेबेवाडीतील कार्यकर्ते तसेच शिष्टमंडळातील सर्व मान्यवर उपस्थित होते.