एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा चौकातील हॉटेल श्रीकृष्ण येथे आकाश भगवान कदम वय 28 राहणार खेड तालुका सातारा हा गुटखा आणण्यासाठी गेला असता त्याला प्रशांत उर्फ गोट्या वामन पवार (वय 24), संतोष रामचंद्र साळुंखे (वय 40), प्रशांत मोतीलाल कलाल (वय 24, तिघेही राहणार भीमाबाई आंबेडकर नगर, सदर बझार, सातारा) आणि आसिफ शेख (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या चौघांनी हाताने तसेच फायबरच्या पाईपने मारहाण केल्याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दबडे करीत आहेत.


