सातारा तालुका परिसरातील युवतीचा विनयभंग करून तिला धमकी दिल्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल सिंह अजित सिंह चितोडिया राहणार जळगाव असे संबंधिताचे नाव आहे.
सातारा : सातारा तालुका परिसरातील युवतीचा विनयभंग करून तिला धमकी दिल्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल सिंह अजित सिंह चितोडिया राहणार जळगाव असे संबंधिताचे नाव आहे.
सन 2018 ते 31 जानेवारी 2023 या दरम्यान वेळोवेळी अनिल सिंह याने संबंधित युवतीची एक चित्रफित तयार केली होती. तो युवतीला वारंवार भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. भेटण्यास जर गेले नाही तर ती चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली होती. संबंधित युवतीने या धमकीला कंटाळून सातारा तालुका पोलीस ठाण्यात एक जानेवारी रोजी सायंकाळी फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार एस. एस. बागवान करीत आहेत.


