maharashtra

तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोली परिसरात तलवार बाळगल्याप्रकरणी संदेेश सुरेश वीर (वय 25, रा. संभाजीनगर), अक्षय अशोक माळेकर (वय 27, रा. महामुलकरवाडी ता.सातारा) या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस ओंकार डुबल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.