maharashtra

ना. दीपक केसरकर यांनी घेतली खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट


राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी जलमंदिर येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेऊन सुमारे एक तास विविध विषयांवर चर्चा केली.

सातारा : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी जलमंदिर येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेऊन सुमारे एक तास विविध विषयांवर चर्चा केली.

केसरकर यांची ही जलमंदिरला दुसऱ्यांदा भेट होत आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढी व विकासाच्या विविध योजनांची मांडणी यावेळी खा. उदयनराजे यांनी केली.

वाई येथे एका प्रायोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कास पठाराला भेट आणि खा. उदयनराजे यांची चर्चा हे अनौपचारिक कार्यक्रम शुक्रवारी ठरले होते. मात्र, ते न झाल्याने ना. दीपक केसरकर यांनी शनिवारी जलमंदिर येथे खा. उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली. जलमंदिर मध्ये खा. उदयनराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी उपस्थित होते.
केसरकर यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार जरी असला तरी पर्यटन या विषयाची त्यांची विशेष आवड आहे. हा संदर्भ लक्षात ठेवून खा. उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्याचे वाढते पर्यटन, त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य यांच्या संयुक्त उपक्रमातून करावयाच्या विविध योजना याची मांडणी ना. केसकर यांच्यासमोर केली. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सुद्धा दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली. शहरातील नगरपालिका शाळा, खिंडवाडी येथे वारंवार बिबट्याचे होणारे मृत्यू, कास, महाबळेश्वरसह जिल्ह्याच्या पर्यटन वाढीचे विषय मांडले. त्यावर यासाठी योग्य ते सहकार्य करण्याची गावही देत मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निश्चित मदत करू, अशी ग्वाही ना. केसरकर यांनी दिली. त्यानंतर दीपक केसरकर हे तेथून कास पठारावर रवाना झाले.