maharashtra

सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी


सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथील वार्ड नंबर 10 मधून निकिता सतीश चव्हाण रा. मल्हार पेठ, ता. पाटण यांचे अर्धा तोळा वजनाचे, वीस हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण कौसर असिफ शेख (पत्ता माहीत नाही) यांनी चोरून नेले असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.