maharashtra

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सुमारे 75 हजारांची जबरी चोरी


निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत एका दाम्पत्याच्या जवळ असलेली पर्स व त्यातील सुमारे ७४५०० रुपयांचा मुद्देमाल तीन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी करून लुटून नेला आहे.

सातारा : निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत एका दाम्पत्याच्या जवळ असलेली पर्स व त्यातील सुमारे ७४५०० रुपयांचा मुद्देमाल तीन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी करून लुटून नेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अक्षय भानुदास माने वय 33 रा. ढवळेवाडी, ता. फलटण हे आपल्या दुचाकीवरून पत्नीसमवेत त्यांच्या गावाकडे जात होते. त्यावेळी फलटण- लोणंद रस्त्यावर ते आले असता एका मोटरसायकल वरून तीन अनोळखी युवक त्या ठिकाणी आले. त्यांनी माने यांच्या गाडी जवळ गाडी आणून माने यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी तिच्या हातातील लेडीज पर्स हिसकावून पोबारा केला. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या पट्ट्या, चांदीची जोडवी, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत.