maharashtra

शामगाव घाटानजिक लिफ्ट मागून पत्रकाराचे पाकीट चोरले; गुन्हा दाखल


Journalist's wallet stolen from elevator near Shamgaon Ghat; Filed a crime
कराड-वडूज रस्त्यावरील शामगाव घाटा नजिक मोटार सायकल वरून प्रवास करणाऱ्या पत्रकाराला लिप्ट मागून त्यांचे पाकीट चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली गेली आहे.

सातारा : कराड-वडूज रस्त्यावरील शामगाव घाटा नजिक मोटार सायकल वरून प्रवास करणाऱ्या पत्रकाराला लिप्ट मागून त्यांचे पाकीट चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली गेली आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवार दि २७ रोजी पत्रकार तथा छायाचित्रकार अजित अशोक सोनवणे वय ३५ वर्षे, व्यवसाय नोकरी (पत्रकार) रा. कमानी हौदाचे पाठीमागे सातारा हे पत्रकारीता तसेच रिलायन्स लाईफ इन्शुरन्सचे काम करीत वडुजला निघाले होते. इंदोली येथील रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मधील सदस्याची कामे आटोपल्यावर ते मोटार सायकल सी.बी शाईन मो.सा क्र एम एच ११ सी आर ५१४७ वरून निघाले. रस्ता माहीत नसल्याने सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास शामगाव घाट पास करून थोडे अंतर पुढे आलेवर एका अनोळखी इसमाने लिफ्ट मागितली. गाडी थांबवुन तुम्हाला कोठे जायचे आहे? असे विचारले असता त्यांनी गोपुज येथे जायचे आहे असे सांगितलेने त्यांना पाठीमागे मोटार सायकलवर बसवुन निघाले. थोडे अंतर पुढे गेल्यावर सायंकाळी ५.१५ वाजता सदरचा अनोळखी इसम शामगाव घाटाचे पुढे काही अंतरावर उतरला. पत्रकार सोनावणे तसेच मोटार सायकलवरून पुढे वडुज पेडगाव येथे गेले. वडुज पेडगाव येथील काम आटपुन वडुज येथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्याकरीता सायंकाळी ७.४५ वाजता सुमारास गेले त्यावेळी बॅगमध्ये ठेवलेले पाकिट पैसे देणेसाठी पाहीले असता बॅगेमध्ये पाकिट दिसले नाही. म्हणुन बँग व्यवस्थीत तपासून पाहिली. पण पाकीट नव्हते. त्यानंतर वडूज येथे जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने औंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी सोनावणे त्याच रात्री गेले. पाकिट चोरणारा अनोळखी व्यक्तीच्या तोंडावर छोटे छोटे पुरळाच्या खुणा असलेला अंगात पाढ-या रंगाचा फुल बाह्याचा फॉर्मल शर्ट त्यावर काळे ठिपके व काळी ट्रक सूट पॅन्ट असा पेहराव होता. गोपूज ला जायचे आहे. असे त्या व्यक्तीने सांगितल्याचे सोनावणे यांनी सांगितले.
सोनावणे यांच्या ताब्यातील मोटारसायकलवर पाठीमागे बसून बॅगेतील पाकिट व त्यामधील ए.टी.एम. कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम ७०६० रुपये, ओळखपत्र, आधार कार्ड मुद्देमाल सायंकाळी ४.४५ ते ५.१५ या कालावधीत संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने घेरून नेहला म्हणुन त्या अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार औंध पोलीस ठाण्यात केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संतोष पाडळे करीत आहेत.