maharashtra

शिरवळ येथून पिकअप ची चोरी


शिरवळ येथून पिकअप ची चोरी झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : शिरवळ येथून पिकअप ची चोरी झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ते 5 डिसेंबर दरम्यान शिरवळ, तालुका खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या ओकिनावा शोरूम समोरील मोकळ्या जागेतून राजेंद्र कृष्णाराव पवार वय 56, रा. पांडे, ता. वाई यांचा टाटा कंपनीचा दोन लाख रुपये किंमतीचा पिकअप अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार शेडगे करीत आहेत.