maharashtra

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद जयंती निमित्त राजुरी येथे १६० जणांनी केले रक्तदान


On the occasion of Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti, 160 people donated blood at Rajuri
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणामुळे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद जयंती निमित्त शिवशक्ती तरुण मंडळातर्फे हाँटेल राजुरी जंक्शन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १६० जणांनी रक्तदान केले.

फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणामुळे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद जयंती निमित्त शिवशक्ती तरुण मंडळातर्फे हाँटेल राजुरी जंक्शन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १६० जणांनी रक्तदान केले.
राजुरी गावचे सरपंच सचिन पवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन रक्तदानास सुरवात करण्यात आली. हाँटेल राजुरी जंक्शन येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमास फलटण दूध संघाचे चेअरमन धंनजय पवार, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाँ. बाळासाहेब सांगळे, तंटामुक्ती अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सोमाशेठ गावडे, सोसायटीचे संचालक डि. एन. गावडे, मफतलाल पवार, विलास गावडे पाटील, विनोद घोलप, शिवाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गावचे सरपंच सचिन पवार यांनी स्वतः अपंग असतानाही रक्तदान करुन तरुण पिढीपुढे एक वेगळा कणखर अनुभव उभा केला आहे. मनोज साळुंखे व अर्चना साळुंखे या दाम्पत्यांनी रक्तदान करुन महिलांनीही रक्तदान करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. वय वर्ष 52 व्या वर्षी ट्रेकिंग योद्धा पोपटराव हगारे यांनीही रक्तदान केले. तसेच वैद्यकीय अधिकारी मोहन कर्णे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र माळवे यांनी देखील रक्तदान केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन डाँ. मोहन कर्णे, हेमंत बागाव, माऊली जाधव, बाबुराव जगताप यांनी केले होते. सचिन जाधव, राजुकुमार पवार यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.