maharashtra

पित्यास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा


पित्यास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी मुलावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : पित्यास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी मुलावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खोडद तालुका सातारा येथील तुकाराम दगडू आवळे वय 85 यांना दगडाने मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा श्रीकांत तुकाराम आवळे यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महाडिक करीत आहेत.