गळती लागलेल्या 'त्या' जलवाहिनीचे पुन्हा खोदकाम
खड्डयाच्या डांबरीकरणासाठी बांधकाम विभागाने केली पडताळणी
येथील तहसीलदार कार्यालयासमोर भाजी मंडई जवळ जलवाहिनीला गळती लागून रस्त्याला खड्डा पडल्याची घटना घडली होती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा रस्ताचे खड्डयाचे डांबरीकरण करण्यासाठी त्याच ठिकाणी खोदकाम करून बांधकाम विभागाने गळती पुर्ण निघाली की नाही, याची पडताळणी केली.
सातारा : येथील तहसीलदार कार्यालयासमोर भाजी मंडई जवळ जलवाहिनीला गळती लागून रस्त्याला खड्डा पडल्याची घटना घडली होती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा रस्ताचे खड्डयाचे डांबरीकरण करण्यासाठी त्याच ठिकाणी खोदकाम करून बांधकाम विभागाने गळती पुर्ण निघाली की नाही, याची पडताळणी केली.
काही दिवसापूर्वी येथील तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्यामुळे रस्त्याला खड्डे पडून हजारो लिटर पाणी वाया गेले होते. ही बाब समजताच प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सुमारे दोन दिवस गळती काढून रस्त्याला पडलेला खड्डा बुझविला होता. मात्र या खड्डयाच्या डांबरीकरण करण्याचे काम करण्यासाठी बांधकाम विभागाने आज तो खड्डा पुन्हा खोदत जलवाहिनीला लागलेल्या गळतीचे काम पूर्ण झाले आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी त्याच ठिकाणी खोदकाम केले. जलवाहिनीला लागलेली गळती पूर्णपणे काढण्यात प्राधिकरणाच्या कर्मचार्यांना यश आल्याचे लक्षात आल्यानंतर येत्या दोन दिवसात त्या खड्डयाचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


