एमआयडीसी परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची घरफोडी केली आहे.
सातारा : एमआयडीसी परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची घरफोडी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एमआयडीसी परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी रोहित सुनील पाटील (वय 24) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 रोजी घडलेली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातून तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, अर्ध्या तोळ्याची सोन्याची चेन, अर्ध्या तोळ्याची कर्णफुले असा चार तोळे वजनाचा ऐवज चोरुन नेला.


