राहत्या घरातून एक महिला कुठेतरी निघून गेली आहे, याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक महिला कुठेतरी निघून गेली आहे, याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी साडेआठ वाजता प्रतापसिंहनगर येथून उषा चंद्रकांत कांबळे वय 32 ही महिला राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस फौजदार भोसले अधिक तपास करीत आहेत.


