आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीरज तानाजी बोडरे उर्फ फकीभाई रा. कोरेगाव, ता. कोरेगाव याला दोन वर्षासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना तो कोणाची परवानगी न घेता कोरेगाव गावच्या हद्दीतील गारवा चायनीज च्या समोर दिसून आला. अधिक तपास पोलीस हवालदार करणे करीत आहेत.


