एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,दि. २२ मे रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास खोकडवाडी (कोडोली) ता. सातारा गावच्या हद्दीत ओमकार सुरेश कदम रा. शेंद्रे, ता. सातारा हे दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीची धडक रस्त्यावरील पादचाऱ्यांना बसून ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी अज्ञात कारने त्यांना धडक दिल्याने यात्रेत यांचा मृत्यू झाल्याची तक्रार श्रीमती नीलम ओंकार कदम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


