maharashtra

अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू


अपघातात जखमी झालेल्या महिलेचा कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली.

सातारा : अपघातात जखमी झालेल्या महिलेचा कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शोभा शिवाजी पाटोळे, वय ४३, रा. वाघेरी, ता. कराड ही महिला दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दि. ४ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाल्याची खबर औंध पोलीस ठाण्यात दिली.