शासकीय कामात अडथळा प्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : शासकीय कामात अडथळा प्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल, सोमवार पेठ, सातारा येथील उप मुख्याध्यापक सुजाता पाटील यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्याशी शाळेच्या कामासंदर्भात विजय ज्ञानू गुरव रा. गडकर आळी, सातारा हे चर्चा करत असताना शासकीय कामात अडथळा आणून इरफान लाला बागवान रा. शनिवार पेठ, सातारा आणि त्याच्यासोबत चा एक अनोळखी इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांनी गुरव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.


