अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका नवीन घराच्या बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये नेऊन त्यांच्यासमोर असभ्य कृत्य केल्याप्रकरणी राजू खरात रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गोडोली, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.