शेंद्रे ता.सातारा येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय येथून चक्क अनोळखी युवतीने 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने व रोकड चोरुन नेले.
सातारा : शेंद्रे ता.सातारा येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय येथून चक्क अनोळखी युवतीने 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने व रोकड चोरुन नेले. ही घटना दि. 4 रोजी घडली असून याप्रकरणी सोनल राहूल पवार (वय 34, रा. शाहूनगर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विवाह कार्य असल्याने त्या दिवशी लग्नामध्ये गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेवून अनोळखी युवतीने नवर्या मुलाच्या खोलीमधून 30 हजाराचे सोन्याचे पदक, 15 हजाराचे झुमके, 15 हजाराची सोन्याची अंगठी, 30 हजाराची सोन्याची चेन, 15 हजाराचे कानातले वेल, 15 हजाराचे कानातले टॉप, 15 हजाराची अंगठी, चांदीचे करंडे, चांदीची गणपतीची मुर्ती व आहेराचे सुमारे रोख 1 लाख रुपये असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
संबंधित ऐवज तक्रारदार यांच्याकडे असताना तो चोरून संशयित युवतीने गर्दीचा गैरफायदा घेवून पोबारा केला. याबाबतची घटना समोर आल्यानंतर माहिती घेण्यात आली. संशयित अनोळखी युवती असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


