म्हाडा कॉलनी, सदरबझार येथे घरगुती वादातून तलवार नाचवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : म्हाडा कॉलनी, सदरबझार येथे घरगुती वादातून तलवार नाचवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हणमंत राजेंद्र पवाडे (वय 29) यांनी सतीश पवाडे, मलिंगा व त्यांचा एक साथीदार (सर्व रा. म्हाडा कॉलनी, करंजे) यांच्या विरुध्द तक्रार दिली. ही घटना दि. 25 रोजी सदरबझार येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी संशयितांनी दमदाटी करत शिवीगाळ केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.


