जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
सातारा : जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
दत्तात्रय सर्जेराव साळेकर वय 35 राहणार संगम माहुली, तालुका सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी गणेश बाळासाहेब शिंदे रा. तांबवे, तालुका फलटण हे सातारा येथील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेले असताना जिल्हा रुग्णालय येथून एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी ओळख करून त्यांना अजंठा चौक येथे मोटरसायकल वरून सोडण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी त्या अनोळखी इसमास स्वतःच्या मोटरसायकल वरून अजंठा चौकाच्या पुलाखाली रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोडले. यावेळी अचानक या अनोळखी इसमाने त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. तसेच तेथील लाकडी दांडक्याने ने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यामध्ये शिंदे हे बेशुद्ध झाल्याने त्यांची मोटरसायकल, मोबाईल, सोन्याची चेन व अंगठी चोरून संबंधित इसम पळून गेला. शिंदे यांनी उपचार घेतल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवली होती.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर तसेच पोलीस उपअधीक्षक शिंदे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मार्गदर्शन व सूचना केल्या. त्याप्रमाणे निंबाळकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकास हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्याने डीबी पथकाने शहर परिसरातील रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेतली. त्याप्रमाणे शोध घेत असताना एका सराईत गुन्हेगाराने हा गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला 24 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. प्रथम हा सराईत गुन्हेगार उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबूल केले. या गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील चोरी केलेला मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे. संशयिताकडे अजून चौकशी सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे ,विक्रम माने, संतोष कचरे, गणेश भोंग ,सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ तसेच सायबर सेलचे महेश पवार, सुशांत कदम प्रवीण अहिरे यांनी सहभाग घेतला.


