खडकी, ता. वाई गावच्या हद्दीतून घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने एक दुचाकी, मोबाईल व एक एलईडी टिव्ही असा एकूण 19 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : खडकी, ता. वाई गावच्या हद्दीतून घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने एक दुचाकी, मोबाईल व एक एलईडी टिव्ही असा एकूण 19 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी एक ते दि. 26 रोजी साडेसहा वा. सुमारास खडकी येथील महादेव माळावर असणार्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्र. एमएच 11 सीएन 8460, एक मोबाईल आणि 32 इंची एलईडी टिव्ही तसेच मोकळ्या पाकिटात असलेले आधार, पॅन, मतदार कार्ड असा एकूण 19 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार महेश तुकाराम शिंगटे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे.


