maharashtra

लिंबखिंड येथून ५० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी


लिंबखिंड, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : लिंबखिंड, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ सप्टेंबर रोजी १.३० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास लिंबखिंड गावच्या हद्दीतील ज्योतिर्लिंग प्रसन्न स्टोन क्रेशरवरून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपयांच्या साहित्याची चोर केल्याची तक्रार प्रवीण ज्ञानेश्वर ओंबळे, रा. रामनगर, ता. सातारा यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली.