आनेवाडी टोल नाक्यावर जुगार खेळवून फसवणूक करणारी टोळी भुईंज पोलिसांकडून जेरबंद
सात जण ताब्यात; चार लाख 19 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
आनेवाडी टोलनाक्याच्या हद्दीत महामार्गाच्या लगत तीन पानी काला पिला नावाचा जुगार खेळवून ट्रक चालकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला भुईंज पोलिसांनी मध्यरात्री सव्वा एक वाजता ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा : आनेवाडी टोलनाक्याच्या हद्दीत महामार्गाच्या लगत तीन पानी काला पिला नावाचा जुगार खेळवून ट्रक चालकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला भुईंज पोलिसांनी मध्यरात्री सव्वा एक वाजता ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अक्षय सयाजी सोनवणे वय 29 रा. विरमाडे, ता. वाई, हरिश्चंद्र मखनलाल पटेल वय 30 राहणार करंजे पेठ सातारा, मूळ राहणार कुलारवर उत्तर प्रदेश, रवी कुमार राम रतन सिंग वय 37 राहणार मरीन ड्राईव्ह मुंबई मूळ राहणार जमशेदपूर झारखंड, विजय सखाराम यादव वय 42 राहणार गोळीबार मैदान सातारा मूळ राहणार कोंडवे,तालुका सातारा,राजू भगवान देढे वय 55 राहणार वडाळा मुंबई, बाळू भगवान राजगुरू वय 55 राहणार टाकळी मानूर तालुका पाथर्डी जिल्हा नगर, कृष्णा आप्पा शेटे वय 43 राहणार चिंचपाडा कल्याण जिल्हा ठाणे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, आनेवाडी टोलनाच्या हद्दीत जावळी गावच्या बाजूला पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काहीसं ट्रक चालकांना तीन पानी काला पिला नावाचा जुगार खेळून त्यांची फसवणूक करत होते. अशी माहिती मिळाल्यावर भुईंज पोलीस स्टेशनचे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी यांनी छापा मारून रात्री सव्वा एकच्या दरम्यान ही कारवाई केली. काही इसम हायवे रोडच्या कडेला टेबल लावून बॅटरीच्या प्रकाशात वाहन चालकांना थांबवून तीन पानी नावाचा जुगार खेळवत होते. पोलिसांनी संबंधितांना जेरबंद केले, त्यांच्याकडून दहा हजार रुपयाची रोख रक्कम, पांढऱ्या रंगाची मारुती कार, एक्टिवा मोटरसायकल, आठ मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य असा चार लाख 19 हजार चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला आहे.
भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईंजचे पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, राजाराम माने, रविराज वरळीकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, राजेश कांबळे, सुहास कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.


