maharashtra

शाहूपुरी पोलिसांकडून लोखंडी साहित्य चोरीचा गुन्हा उघडकीस

दोन महिलांसह साहित्य विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास अटक

Shahupuri police detects theft of iron material
सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील रमाकांत टॉवर्स येथे सुरु असलेल्या बांधकाम साइटटवरुन लोखंडी साहित्य चोरुन नेणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्याकडून चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली आहे.

सातारा : सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील रमाकांत टॉवर्स येथे सुरु असलेल्या बांधकाम साइटटवरुन लोखंडी साहित्य चोरुन नेणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्याकडून चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २६ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी यादोगोपाळ पेठेतील गोलमारुती मंदिराजवळ असलेल्या रमाकांत टॉवर्स येथून बांधकाम चालु असताना काही अनोळखी महिलांनी लोखंडी गेट, लोखंडी पाईप व लोखंडी अँगल असा  ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत मनिष प्रभाकर आंबेकर रा. रविवारपेठ सातारा यांनी दि. २८ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या चोरीचा छडा लावण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या होता. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने तपास सुरु केला असता पथकाला गोपनीय बातमीदाराकडून सैदापुर, ता. सातारा येथील काही महिलांनी ही चोरी केली असल्याची माहिती मिळाली. या महिलांचा शोध घेत असताना महिला आरोपींची नावे, पत्ते निष्पन्न करुन त्यांचा शोध घेवून पोलिसांनी पूनम मुकेश जाधव वय २६ व शोभा सुरेश जाधव वय ५० दोघी रा. गोसावीवस्ती सैदापूर ता. सातारा यांना अटक केली.
या महिलांनी चोरी केली असल्याची कबुली दिली. तर या महिलांनी चोरुन आणलेला मुद्देमाल हा सातारा शहरातील एका भंगार व्यावसायिकास विकला असल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने युवराज सुरेश जगताप वय ३२ रा.केसरकरपेठ सातारा याला अटक करुन त्याच्याकडून ७ हजार रुपये किंमतीचा चोरीचे साहित्य हस्तगत केले आहे. या गुन्ह्यातील महिलांची आणखी एक साथीदार सध्या फरार आहे.
कारवाईत पोलीस अधिक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो.हेड.कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो.ना. अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत व म.पो.ना. सुवर्णा बोराटे यांनी केली आहे.