maharashtra

दारूच्या नशेत पडून एकाचा मृत्यू


दारूच्या नशेत तोल जाऊन पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : दारूच्या नशेत तोल जाऊन पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिपक लक्ष्मण पवार, वय ३५, सध्या रा. धनगरवाडी, ता. सातारा मूळ राहणार ठोसेघर दारूच्या नशेत तोल जाऊन पडून जखमी झाला होता. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. २७ रोजी ४ वाजण्याच्या पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची खबर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.