maharashtra

'तौलनिक साहित्याभ्यास : नव्या दिशा' या पुस्तकाचे पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते बुधवारी कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रकाशन


Comparative Literature Study: New Directions
कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील महाविद्यालयामध्ये डॉ.भरत जाधव यांनी लिहिलेल्या तौलनिक साहित्याभ्यास : नव्या दिशा या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश एन. देवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी दिली.

सातारा : कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील महाविद्यालयामध्ये डॉ.भरत जाधव यांनी लिहिलेल्या तौलनिक साहित्याभ्यास : नव्या दिशा या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश एन. देवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी दिली.
आजच्या काळात साहित्याभ्यासामध्ये तौलनिक साहित्याभ्यास ही अभ्यासपध्दती खूप महत्त्वाची ठरताना दिसून येत आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भारतीय भाषांचा अभ्यास करत असताना तौलनिक अभ्यासपध्दतीचा वापर करावा लागतो. संपूर्ण देशभरातील विद्यापीठातून तौलनिक साहित्याभ्यासकेंद्रामधून अशा प्रकारचा अभ्यास केला जात आहे. एम.ए.,एम.फिल,पीएच.डी. करणाऱ्या संशोधकांना तौलनिक साहित्याभ्यास : नव्या दिशा हे पुस्तक निश्‍चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील शाहू सभागृहामध्ये बुधवार दि. २२ रोजी संकाळी १०.०० वा.संपन्न होणार आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभागाचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे व्हा. चेअरमन जयेंद्र चव्हाण, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. उदय जाधव, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश दुकळे हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. दिलीप गायकवाड या कार्यकमाच्या
अध्यक्षस्थानी असतील तरी कोरोना नियमाचे पालन करून या कार्यक्रमाचा लाभ सर्व संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.