maharashtra

खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप


ऋषीकेश आबा निकम याच्या खून प्रकरणी मोक्का खटल्यातील आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यास न्यायालयाने जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सातारा : ऋषीकेश आबा निकम याच्या खून प्रकरणी मोक्का खटल्यातील आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यास न्यायालयाने जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जांब, ता.कोरेगांव या गावी दि 5/9/2014 रोजी सायं 6.00 वा. आबा जयसिंग निकम यांचा मुलगा ऋषीकेश आबा निकम (वय १८) व त्याचे चुलते जितेंद्र जयसिंग निकम हे आरोपी रविंद्र निकम याचे घरी त्यांच्यामध्ये असलेला पुर्वीचा वाद, भांडण मिटविण्यासाठी तंटा मुक्ती समितीपुढे यावे, हा निरोप देण्यास गेले असता आरोपी रविंद्र याने त्याच्या घरातील लोकांबरोबर ऋषीकेशवर तलवारीने पोटात वार केला. या हल्ल्यामघ्ये सोहील निकम व सचिन निकम यांचीही हात होता. पण त्यांना संशयाचा फायदा देण्यात आला.
हल्ला झाल्यानंतर प्रत्यक्ष घटना पाहणारे जितेंद्र जयसिंग निकम, निलेश निकम, राकेश शिखरे, मयुर डांगे यांनी ऋषीकेश यास सातारा हास्पिटल मध्ये उपचारासाठी आणले. तथापी तो मयत झाला. हा खुनाचा प्रकार विचारात घेऊन या खुनात बचाव व्हावा म्हणून आरोपी रविंद्र याने कोरेगांव पोलीस स्टेशन मध्ये जितेंद्र जयसिंग निकम व सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या विरूध्द कोरेगांव पो.ठाणे येथे खोटी तक्रार दिली.  
या खून प्रकरणी ऍड. विकास बा. पाटील- शिरगांवकर यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहीले. सदर कामी 10 साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावा व शाबीत केलेला वैद्यकीय पुरावा, परिस्थिती जन्य पुरावा, पंचनामा याचा विचार करून, मोक्का खटल्यातील आरोपी रविंद्र गोरख नाथ निकम यांस ऋषीकेश चा खून केला म्हणून जन्मठेप तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हे प्रकरण हे सन 2019 मध्ये सुरू झाले. पण कोरोना च्या काळात काम चालले नाही. सन 2021 मध्ये हे प्रकरण सुरू  झाले. ऍड विकास पाटील-शिरगांवकर यांनी खुन प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहून आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यांस आजन्म कारावासाची शिक्षा घेतली.