maharashtra

जातीवाचक शिवीगाळीसह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा


एकास जातीवाचक शिवीगाळीसह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास जातीवाचक शिवीगाळीसह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 फेब्रुवारी रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिर गोडोली च्या समोर असणाऱ्या संतोष वडापाव स्टॉलच्या इथे आतिश आनंदा कांबळे रा. विलासपूर, गोडोली, सातारा यांना मयूर सपकाळ व त्याच्या इतर पाच ते सहा साथीदारांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे करीत आहेत.