maharashtra

बाणगंगा नदीच्या पुलावरून ट्रेलर कोसळून एकाचा मृत्यू; एक जखमी


One killed as trailer falls off Banganga river bridge; One injured
पुण्याकडून सांगोला जाणाऱ्या 22 चाकी ट्रेलरचा फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून चाळीस ते पन्नास फूट खाली कोसळून करप्पा रेवन गावडे याचा मृत्यू तर एक जखमी झाल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण : पुण्याकडून सांगोला जाणाऱ्या 22 चाकी ट्रेलरचा फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून चाळीस ते पन्नास फूट खाली कोसळून करप्पा रेवन गावडे याचा मृत्यू तर एक जखमी झाल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,  दिनांक 18/5/2022 रोजी रात्री 01.00 वाजण्याच्या सुमारास लोणंद फलटण रोडवर बाणगंगा नदीच्या पुलावर ट्रेलर चालक विजय शामराव बुरंगे (रा. बुरूंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) व त्याचेबरोबर असलेला बदली ड्रायव्हर करप्पा रेवन गावडे (रा . तरंगेवाडी जवळा ता. सांगोला, जि. सोलापुर) असे दोघेजण पुण्यावरून गावी सांगोला येथे 22 चाकी ट्रेलर क्रमांक MII 09 FL 1109 घेवून निघालेले असताना लोणंद फलटण रोडवरती बाणगंगा नदीच्या पुलाच्या जवळ आल्यावर अचानक ड्रायव्हरच्या डोळ्यावरती प्रकाश पडल्याने व रस्त्याच्या परिस्थीतीचा अंदाज न आल्याने तसेच गाडी भरधाव वेगात असल्याने गाडी पुलावरून खाली कोसळून करप्पा रेवन गावडे यांच्या मयतास व स्वताःचे जखमी होण्यास कारणीभुत झाला म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालक विजय शामराव बुरंगे रा. बुरूंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.