उंब्रज येथे वृध्द महिलेचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
उंब्रज : उंब्रज येथे वृध्द महिलेचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज येथील आठवडी बाजाराच्या निमित्ताने उंब्रज परिसरातील वयोवृद्ध महिला आपला आठवडी बाजार घेऊन घरी चालत जात असताना सर्व्हिस रोड वरून मागून येणार्या ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांची भरपूर गर्दी जमली. जमाव जमलेला पाहून ट्रक चालकाने तिथून ट्रक घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या ट्रक चालकाचा पाठलाग करून नागरिकांनी ट्रकचालकास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
मृत्यू झालेल्या वृध्देचे चे नाव लक्ष्मी जगन्नाथ पाटणे. रा.उंब्रज ता. कराड असून त्या 70 वर्षांच्या होत्या. भाजीपाला घेऊन घरी जात असताना तसेच आठवडी बाजारामुळे रस्त्यावर गर्दीचे प्रमाण जास्त होते. सर्व्हिस रोडवरून कराड च्या दिशेने निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली अचानक आल्याने संबंधित ट्रक चालकास लोकांनी ट्रक मागे घेण्यास सांगितले. परंतु ट्रक चालकाने ट्रक वेगाने पुढे नेला. त्यामुळे ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून पाटणे यांचा जागीच मृत्यू झाला.


