maharashtra

शिंगणापूर येथे जावयाची सासऱ्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या


Son in law commits suicide by hanging himself at his father-in-law's house in Shinganapur
शिंगणापुर, ता. माण  येथे जावयाने त्यांच्या सासऱ्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सातारा : शिंगणापुर, ता. माण  येथे जावयाने त्यांच्या सासऱ्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१२ एप्रिल रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर येथे सुनिल रामचंद्र नागणे, वय ४७, रा. म्हसवड, ता. माण यांनी त्यांचे सासरे रामचंद्र गोरे यांच्या राहत्या घरात लोखंडी चॅनेलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर राजेंद्र रामचंद्र नागणे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली.